पंढरपूरचे विठोबा मंदिर हे कोट्यवधी हिंदू भाविकांचं आराध्य दैवत तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठलाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरामुळे पंढरपुरला दक्षिण काशी म्हणतात. इसवी सन ५१६ मध्ये सापडलेल्या ताम्रपटापासून पंढरपूरचा आणि त्याच्या आसपास असणाऱ्या काही गावांचा उल्लेख आढळतो.
तुळजापूर हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातले शहर आहे. येथे तुळजाभवानीचे प्रसिद्ध मंदिर असून ते महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असल्याची हिंदू भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी असते.
स्वामी समर्थांची नगरी. अक्कलकोट हे स्वामी समर्थ भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे. अक्कलकोटला स्वामींचे भव्य मंदिर व त्यांचा गावातील मठ आहे. मंदिराच्या अन्नछत्रामध्ये प्रत्येक दिवशी अंदाजे ४/५ सहस्र भाविक महाप्रसाद ग्रहण करतात. मंदिराची धर्मशाळा अप्रतिम आहे. अक्कलकोटचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील एक मोठे शस्त्रगृह. येथे अनेक जुन्या परंपरागत शस्त्रांचा संग्रह येथील भोसले राजघराण्याने प्रदर्शन स्वरूपात जतन करून ठेवलेला आहे.
गाणगापूर हे कर्नाटकाच्या गुलबर्गा जिल्ह्यातील गाव आहे. अफझलपूर तालुक्यातील हे गाव दत्तात्रेयाच्या देवळासाठी प्रसिद्ध आहे.
गाणगापूर भीमा नदी व अमरजा नदीच्या संगमावर वसलेले आहे.
oSf’k”B
lekfo”B
Submit your review
|
|
|
0 reviews